🕒 1 min read
मुंबई : नुकतेच सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
तर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील सरकारची भूमिका पुढे नेली आहे. काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी सिनेमांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी सिनेमांचे आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
थोरात म्हणाले की, आज मराठी सिनेमा गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे असं देखील ते म्हणाले.
तीन दिवस सादर करण्यात आलेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण ठरत असताना या सगळ्या बाबींचा विचार करून एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ञांकडून ठोस सूचना मिळतील असा विश्वासथोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर
- अजून एक दणका!, अर्णबचा मुक्काम आता ‘या’ कारागृहात!
- मी समाजाला तोडणार नाही, तर जोडणार आहे- बायडेन
- भारतीय वंशाची महिला अमेरिकन उपराष्ट्रपती होणार; जाणून घ्या या महिलेबद्दल
- मुख्यमंत्री ठाकरे आज दुपारी जनतेशी साधणार संवाद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
