Share

मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना नेत्यानेच घेतली राज्यपालांची भेट !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रार्थनास्थळे खुली करण्यापासून ते कंगनाच्या वादापर्यंत महाविकास आघाडीतील नेते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात विसंगती असल्याचे समोर आले होते. तर, राज्यपालांनी प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाकरेंनी देखील रोखठोक प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात आलबेल नसल्याचं दिसून आलं होतं.

तर, राज्यातील अनेक मुद्द्यांवरून भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेता थेट राज्यपालांच्या भेटीला जात असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप नेत्यांना लक्ष केलं होतं. यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पात्र पाठवूनसुद्धा वेळ देत नाहीत अशी तक्रार भाजप नेत्यांनी केली होती. आता चक्क एका शिवसेनेच्या नेत्यानेच राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत अशी मनातील सल बोलून दाखवली आहे.

राज्यातील प्रश्नांना घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका अलीकडेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती, राऊतांचा निशाणा भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होता, पण आता खुद्द स्वतःच्या पक्षातील नेत्यानेच उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून राज्यपालांना भेटावे लागले असं बोलून दाखवलं आहे.

शुक्रवारी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, किशोर तिवारी हे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत, विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा, खुद्द राज्यपालांनी या भागाचा दौरा करावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी निवेदनद्वारे केली.

या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण मुख्यमंत्री भेटले नाहीत, त्यामुळे राज्यपालांकडे जाऊन भेट घेतली, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.मागील ४ दिवसांपासून किशोर तिवारी मुंबईत आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना भेट झाली नाही अखेर तिवारी यांना राजभवनाचे दार ठोठावले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ५० वेळा फोन केला, पण उत्तर आलं नाही – राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांसाठी नॉट रिचेबल असतात, अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट झाली नाही. अमर उजालाच्या वृत्तानुसार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ५० वेळा फोन केल्याचा दावा केला. पण मुख्यमंत्र्यांकडून काहीही उत्तर आलं नाही. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेत आपल्या मागणीसाठी राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!