🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेता गोविंदा याची मुलगी टीना अहुजा हीचा बॉलीवूड मधील पहिला सिनेमा ‘सेकंड हैंड हसबँड’ हा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु या सिनेमाला तेवढी पसंती चाहत्यांकडून मिळली नाही. त्यानंतर टीना बॉलीवूड पासून लांब गेली होती. त्या चित्रपटानंतर टिनाने कोणताच चित्रपट केला न्हवता. एवढ्या मोठ्या ब्रेक नंतर टीना पुन्हा एकदा बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे.
टीना आहूजा तिच्या आगामी सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. तिची शॉर्टफिल्म ‘ड्रायव्हिंग मी क्रेझी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही शॉर्टफिल्म ऑनलाइन डेटिंगवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. टिनाचा या शॉर्ट फिल्म मधील लुक चाहत्यांना फार आवडला आहे. या शॉर्ट फिल्मसाठी टिनाने बरीच मेहनत घेतली आहे. टिना या वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करेल का? हे पाहण्याजोगे ठरेल.
अभिनेत्री रवीना टंडन हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टीनाचा हा नवा सिनेमा प्रमोट केला आहे. तिने ट्विट करत लिहिले की, ‘एक मस्त शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे. माझी मैत्रीण पूर्णिमा लामछानेने ही शॉर्टफिल्म डिरेक्ट केली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये टीना आहुजासोबत मुदित नायर दिसणार आहे. दोघांची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडू शकते.
Here's a #mastmast short film #DrivingMeCrazy premiering on @Zee5 tonight written and directed by my friend Purnima Lamchhane @purnimalamchhan starring @TinaAhuja16 and #MuditNayar, produced by #SurenderBhatia of Glimpses pic.twitter.com/BK65HE6mgc
— Raveena Tandon (@TandonRaveena) October 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- BREAKING: वादविवादानंतर अखेर बदलण्यात आले ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

