Share

पवार साहेब मानलं तुम्हाला…एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली : निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. ठाकरे यांनी दिलेल्या आदेशामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे यांनी परवा रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली.महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले.

दरम्यान, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

पवारांनी लगावलेल्या टोल्यामुळे भाजपला टीका करण्याची संधी मिळाली असून आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सेनेला डिवचलं आहे. पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा घ्या घरचा आहेर, ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’,असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला भाजपनेते माजी खासदार निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली असं राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!