🕒 1 min read
मुंबई- कालचा मुंबई आणि बंगलोरचा सामना पाहताना, सुर्यकुमार यादव या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने केलेली कामगिरी पाहता; या खेळाडूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘भारतीय संघात स्थान का मिळाले नसावे’ हा प्रश्न सध्या क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.
समाज माध्यमांमध्ये सुद्धा हा मुद्दा बऱ्याच प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. या खेळाडूची अशी चांगली कामगिरी ही केवळ कालची किंवा केवळ या IPL मधली नसून, गेल्या ३ वर्षात हा खेळाडू मुंबई इंडियन्स कडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला आहे.
सूर्यकुमारच्या या बहारदार खेळीनंतर न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसने त्याला ऑफर दिली आहे. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टीमकडून खेळू शकशील का?, असं ट्विट करत स्कॉटने सूर्यकुमारला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.
I wonder if Suryakumar Yadav fancies playing International cricket he might move overseas #CoughNZCough
— Scott Styris (@scottbstyris) October 28, 2020
आपल्या कामगिरीत सातत्य दाखवून देखील यादवला गेली २ वर्षे भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. काहीच्या मते कोत्या स्वभावाचे काही मंडळी यादवला टीम इंडियात जागा मिळू देत नसल्याची चर्चा आहे. आता स्कॉट स्टायरिसने दिलेल्या या ऑफरचा यादव विचार करणार का हा मुख्य मुद्दा उरला आहे.
दरम्यान, बुधवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बलाढ्य मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 विकेट्सने पराभव केला. मुंबईचा 12 व्या सामन्यादरम्यानचा हा आठवा विजय आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले ऑफ मध्ये आपली जागा बनवली आहे. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादव याने महत्वाचे योगदान दिले. त्याने नाबाद 79 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : तातडीने घटनापीठ स्थापन करा! सरकारची मुख्य न्यायमुर्तींना दुसऱ्यांदा विनंती
- नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- निष्टावंतांना डावलून कॉंग्रेसकडून ‘हे’ नाव निश्चित ; वाचा काय आहे प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

