Share

राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे, भाजपात कधी चौकशी लागेल याची भीती होती

Published On: 

नाशिक: राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे,नाहीतर भाजपात कधी चौकशी लागेल याची भीती होती.अशी मनातील भावना भाजप बंडखोर आणि नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवासी झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांकडे बोलून दाखवली आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खडसेंना प्रवेश देण्यात आला.

खडसे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे, भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती.तसेच अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असं देखील त्यांनी म्हटले आहे.

मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान भाजपा सोडण्याचा फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, अशी टीका देखील एकनाथ खडसे यांनी भाजपावर केली आहे.

१२ ते १५ माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.आता खड्सेंसोबत भाजपात येणारे हे आमदार कोण ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!