Share

बोले तैसा चाले … : फडणवीस सरकारी रुग्णालयातच घेताहेत कोरोनावरील उपचार

Published On: 

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक नेते, गावकरी आले होते.

याशिवाय त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे’. अस ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. तर माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी ! अस फडणवीस म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांच्याशी बोलताना, त्यांनी कोरोनाची लागण झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल कर, असे म्हटले होते. फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज हे सरकारी रुग्णालय आहे.

मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजन यांना जुलै महिन्यात केली होती. फडणवीस-महाजन यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर खुद्द महाजनांनीच अशी बातचित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!