🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
आता अनेक खाजगी कार्यालायसह दैनंदिन व्यवहार सुरु झाल्यामुळे नागरिकांना दळणवळण करावे लागत आहे. मात्र, सद्या मुंबईतील लाईफलाईन असलेली लोकल सेवा अजूनही बंद ठेवल्याने बेस्ट वरील ताण वाढत आहे. बेस्ट बसेसमध्ये तुडुंब गर्दी होत असूनही राज्य सरकार व महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून मनसेने देखील आक्रमक भूमिका घेत कायदेभंग आंदोलन केले होते.
आता, मुंबईकरांना लोकलचा नाही पण किमान मेट्रोचा तरी दिलासा मिळाला आहे. मुंबई मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास काहीसा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.
लोकलसेवा कधी?
राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ.’ असा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादातून केला होता.
महत्वाच्या बातम्या-
- बिहार निवडणुकांसाठी ‘बिस्किटा’नंतर शिवसेनेला मिळालं ‘तुतारी वाजवणाऱ्या मावळ्याचं’ चिन्ह
- नेमकं कोण सरकारसोबत करतंय घातपात? चंद्रकांत पाटलांनी केला गौप्यस्फोट
- खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा- प्रीतम मुंडे
- एकरी २५ हजाराची मदत करा, नाहीतर शेतकऱ्यांसोबत मंत्र्यांच्या दारात दसरा-दिवाळी साजरी करू
- बापरे! अटल बोगद्याची सोनिया गांधींनी पायाभरणी केलेली कोनशिलाच चक्क गायब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
