Share

शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शेतमालाचा भाव उद्योजकांच्या मर्जीवर- बाळासाहेब थोरात

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना भांडवलदाराच्या दावणील बांधणारे शेतकरी विरोधी कायदे सभागृहामध्ये दडपशाहीने मंजूर करून घेतले.

यामुळे शेतमालाचा भाव उद्योजकांच्या मर्जीवर राहणार आहे. या काळ्या कायद्यांविरोधात कॉंग्रेसने महाराष्ट्रात आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता १५ ऑक्‍टोबरला महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे.

या रॅलीचे १० हजार गावांत एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

ना.बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू असून १५ ऑक्‍टोबरला संध्याकाळी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणी असणार आहे. संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील, महसूलमंत्री थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, खासदार राजीव सातव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम.संदीप यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुसरा कार्यक्रम औरंगाबाद येथे होणार असून या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अमरावती येथील कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहणार आहे

. नागपूरमधील कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही रॅली होणार आहे. कोकण विभागातील रॅली कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे ना.थोरात म्हणाले.

देशात जातीय तेढ वाढत असून या देशातील महिला सुरक्षित नाही हा अत्यंत चिंतेचा विषय असून प्रत्येक नागरिकाने केंद्राच्या चुकीच्या धोरणांबद्दल आवाज उठविला पाहिजेल. तसेच नव्या कृषी कायद्याने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. नव्या कामगार कायद्याने भांडवलदारांच्या ताब्यात पूर्णपणे कामगारांचे जीवन दिले आहे. केंद्राच्या या दोन्ही काळ्‍या कायद्याने शेतकरी व कामगार पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे, असे ना.थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!