🕒 1 min read
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून म्हटले की, प्रकृती चांगली असून बरे वाटत आहे. करोनाच्या आजाराला घाबरण्याची आवश्यकता नाही. करोनावर आपल्या कार्यकाळात काही चांगली औषधे आणि माहिती नव्याने विकसित झाली आहे. मी २० वर्षापूर्वी जशी तब्येत होती, अगदी तसेच वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
I will be leaving the great Walter Reed Medical Center today at 6:30 P.M. Feeling really good! Don’t be afraid of Covid. Don’t let it dominate your life. We have developed, under the Trump Administration, some really great drugs & knowledge. I feel better than I did 20 years ago!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020
दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ट्रम्प यांच्यावर व्हाइट हाउसमध्ये उपचार सुरू असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :-
- धक्कादायक! राजेश टोपे यांच्या बैठकीत शेतकऱ्याने केले विष प्राशन
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणात सहा महिने उलटल्यानंतर अखेर तीन पोलिसांना अटक
- कोरोना बाधीत मनपा शिक्षकांसाठी बेड आरक्षीत ठेवा : महापौर
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?
- ‘आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
