🕒 1 min read
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत. या निर्णयामुळे दरेकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बँकेने 31 मार्चअखेर साखर कारखान्यांना दिलेली कर्जे तसेच बँकेच्या कार्पोरेट लोन पॉलिसी अंतर्गत दिलेल्या कर्जखात्याची देखील तपासणी या चौकशी समितीमार्फत केली जाणार आहे.
दरम्यान,मुंबई बँकेच्या कारभारात कोणतीही अनियमितता नसून सरकारने राजकीय आकसातूनच ही चौकशी सुरु केली आहे, चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचा दावा भाजपचे नेते व बॅकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
काल प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मुंबई बॅंक तोटा प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या
- मित्रा डोनाल्ड,लवकर बरा हो….’; मोदींनी दिल्या ट्रम्प यांना शुभेच्छा
- मुंबई इंडियन्सचा नाद खुळा;किंग्ज इलेव्हन पंजाबचा दारूण पराभव करत गाठले अव्वल स्थान
- विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट,पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले
- महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
