दुबई-आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) झालेल्या 13 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबला 48 धावांनी पराभूत केले. मुंबईच संघाने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 20 षटकांत मात्र 143 धावाच करता आल्या.पंजाबला 48 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबईचा हा दुसरा विजय ठरला. रोहित शर्मा च्या धडाकेबाज खेळीने मुंबईने पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९१ धावा केल्या. यात कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. परंतू सर्वात लक्षवेधी खेळी ठरली ती कायरन पोलार्डची.पोलार्डने जबरदस्त खेळी खेळून मुंबईला 191 धावापर्यंत पोचवले.
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात दमदार झाली. राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी तीन षटकात 33 धावा करत सामना एकतर्फी होणार नाही हे दाखवून दिले. मात्र बुमराहने मयांकचा त्रिफळा उडवत पंजाबला पहिला धक्का दिला. यानंतर नियमित अंतराने पंजाबचे फलंदाज बाद होत गेले. अखेर पंजाबला संघ 20 षटकात 8 बाद 143 वर रोखत मुंबईने 48 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर, पंजाबची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्सने उभारलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात, मात्र…
- ‘देशात अराजक माजलं आहे,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी’
- आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात,आता तरी चाचण्या वाढवा!
- नागपुरात आता आयव्हीपआर सिस्टीमद्वारे साधला जाणार कोरोना बाधितांशी संपर्क
- भाजपच्या सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही : थोरात


