Share

राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये युवक काँग्रेसकडून निदर्शने!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याने थेट पायी निघालेल्या या दोघांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली काल युवक काँग्रेसच्यावतीने संगमनेर येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. बसस्थानक परिसरातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेपासून, घोषणा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी आदी नेत्यांना दडपशाहीने अटक केल्याच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरात भाजपा सरकारच्या विरोधात रान पेटले आहे. याचे तीव्र पडसाद संगमनेमध्येही उमटले. योगी सरकार डरती है, पुलिसको आगे करती हैं! योगी, मोदी हाय हाय! या घोषणांनी संगमनेर बसस्थानकाचा परिसर दणाणला.

यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, लोकशाही प्रणालीत विरोधी पक्षाची मोठी भूमिका असते. अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांनी खासदार राजीव गांधी यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. हा भारतीय लोकशाही व संविधानाचा अपमान आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता मोदी सरकारला त्यांची जागा दाखवणार असल्याचा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

हुकूमशाही पध्दतीने नरेंद्र मोदी व योगी सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. दंगलराज सुरु असलेल्या उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!