Share

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151वी जयंती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून अभिवादन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151वी जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, गांधी जयंतीनिमित्त प्रिय बापूंना नमन करतो. त्यांच्या आयुष्यापासून आणि उदात्त विचारांमधून बरेच काही शिकायचे आहे. समृद्ध भारत घडविण्यात बापूंचे आदर्श आम्हाला मार्गदर्शन करत राहतात, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीटसोबत स्वच्छतेचा संदेश देणार एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1311843987532050437?s=20

तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे की, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही अन्यायाविरुद्ध झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेल. असत्यावर विजय मिळवताना मी सर्व त्रास सहन करेल, गांधी जयंतीच्या शुभेच्छा, असं राहुल गांधींनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!