Share

‘उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना अतिशय निंदनीय वागणूक दिली’ – शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस गावात एका तरुणीसोबत झालेल्या घटनेने देश हादरला आहे. या पीडितेचा मंगळवारी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात असून देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेससह समाजवादी पार्टी देखील आक्रमक झाल्याचे आज सकाळपासून दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तणावाची स्थिती निर्माण होत असून हाथरस भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे निदर्शकांना हद्दीबाहेरच रोखण्यात आले असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तर, काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह हाथरस गाठले आहे. त्यामुळे तिथे प्रचंड गदारोळ माजला असून कार्यकर्ते व पोलीस यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राहुल गांधी हे कुटुंबियांना भेटण्यावर ठाम असून ते पायीच निघाले. त्यावेळी त्यांची अडवणूक करताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली आहे.

यासर्व घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘उत्तर पोलिसांनी राहुल गांधी यांना दिलेली गलथान वागणूक ही अतिशय निंदनीय आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशा प्रकारे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणे हे निंदनीय आहे’ असे ट्विट करून त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांना अटक!

पोलिसांनी आवाहन करून देखील राहुल गांधी हे कुटुंबीयांना भेटण्यावर ठाम होते. त्यांनी पायी चालत जाण्याचा प्रयन्त केल्यानंतर त्यांना अडवताना झालेल्या गदारोळात धक्काबुक्की देखील झाली. कार्यकर्त्यांनी प्रचंड चीड व्यक्त केल्यानंतर शांततेचे आवाहन देखील राहुल गांधी यांनी केले होते. तर, महामारी तसेच बाबरी विध्वंस प्रकरणानंतर उत्तर प्रदेशमध्ये लावण्यात आलेल्या जमावबंदीचा आदेश तसेच इतर काही नियम तोडल्याचा ठपका लावत उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांना अटक केली.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!