Share

पोलिसांनी लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

https://twitter.com/HardikPatel_/status/1311605937623363585?s=20

काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तर राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनाही ट्विटवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, ‘उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं’ म्हणत योगी सरकारला झापले आहे.

तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्या ठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, याचा न्याय मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मागते आहे, असे वक्तव्य सुळे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!