🕒 1 min read
उत्तर प्रदेश : हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
https://twitter.com/HardikPatel_/status/1311605937623363585?s=20
काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तर राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनाही ट्विटवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, ‘उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं’ म्हणत योगी सरकारला झापले आहे.
महत्वाच्या बातम्या : –
- मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी अन्यथा ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन करू; मराठा समाज आक्रमक
- एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा
- राज्य सरकारच्या अडचणी वाढणार; 10 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- मराठा समाजाची बाजू लोकसभेत भक्कमपणे मांडणार- खा.सदाशिव लोखंडे
- मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये – विनोद पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
