Share

‘कुंभकर्णापेक्षा गाढ झोपलेल्या या सरकारला जाग येत नाही’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : राज्यात आजपासून अनलॉक-५ ची सी सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या टप्प्यात देखील राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत राज्य सरकारने कोणतही पाऊल न उचलल्याने भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे अध्यात्मिक सेलचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी बार-रेस्टोरंट करणाऱ्या या ठाकरे सरकारला देवांबाबत इतका आकस का आहे? असा सवाल केला आहे.

“देवभक्तांच्या आड येण्याचं काम तसेच मंदिरावर अवलंबून छोटे-छोटे दुकानदार, व्यावसायिक आणि रिक्षाचालक असा गरीब घटकांची प्रचंड उपासमार होत आहे, इतकं निष्ठुर आणि निर्दयी सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही. हे असुरी सरकार आहे. गणेशोत्सव झाला, अधिक महिना देखील संपला आता नवरात्रोत्सव येतोय तरी सुद्धा सरकार मंदिर खुलं करत नसून भाजपने घंटानाद आंदोलन केले पण हे कुंभकर्णापेक्षा गाढ झोपलेलं सरकार आहे त्यांना कोणताही फरक पडत नाही” असा घणाघात आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

या सरकारमध्ये हिंदू मंदिर, परंपरा, सण याविषयी आकस असणारे व्यक्ती घटक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत हे सिद्ध झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. देशातील वैष्णोवदेवी तिरुपती बालाजी सह अनेक मंदीर खुले असुन भाविक दर्शन घेत आहेत माञ शिवरायांच्या महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. महाराष्ट्रात मंदीरे खुले नसल्यामुळे धार्मिक स्थळांमधील मंदीरावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न आज गंभीर बनला आहे, असे म्हणत भाजप नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!