Share

एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा

Published On: 

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकही ठाकरे सरकारविरोधात आक्रमक टीका करत आहेत. दिवसेंदिवस मराठा समाजाची नाराजी वाढत असल्याचे चित्र असून आगामी काळात यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढेल अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला.

कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान होत असल्याचे आबा पाटील यांनी संगीतलं. तसंच, एमपीएससी परीक्षांचं करण्यात आलेलं आयोजन त्वरित थांबवून मराठा आरक्षण स्थगिती उठेपर्यंत या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अन्यथा आक्रोशाला समोरं जावं लागेल असे ते म्हणाले आहेत.

तर परीक्षा केंद्रच फोडू!

मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा आक्रमक इशारा देखील आबा पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!