🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील २५ वर्षांपासून मुंबईत तुमचीच सत्ता आहे. त्यामुळे मुंबई तुंबली हे सर्वस्वी तुमचंच अपयश आहे. या २५ वर्षांत मुंबईचे प्रश्न का सोडवण्यात आले नाहीत?अहमदाबाद, चेन्नईमध्ये काय होतं हे सांगून दुसरीकडे बोट दाखवू नका. मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश आहे, अशा शब्दात भाजपचे नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला आहे. कालच्या सामनाच्या अग्रलेखातून मुंबई तुंबण्याची विविध कारणे देतानाच अहमदाबाद, चेन्नईत पाणी तुंबते तेव्हा विरोधक गप्प का बसतात? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आ.विखे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
आ.विखे पुढे म्हणाले की, दरवर्षी मुंबईवर काही हजारो कोटी रुपये खर्च होतात. तरीही मुंबई दरवर्षी तुंबते. गेल्या २५ वर्षांपासून मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई तुंबली त्याचं अपयशही सर्वस्वी शिवसेनेचे आहे. नालेसफाई करताना अनेकांनी आपले हात साफ केले. या भ्रष्टाचाराची चाैकशीची मागणी आपण विधानसभेत केली होती, त्याचे काय झाले, हे शिवसेनेने सांगावे. असे आ.विखे म्हणाले.
काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला चढविला आहे. तसेच मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असल्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही आ.विखे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार
- अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणाऱ्यांचे अभिनंदन गरजेचे आहे
- आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार या आमदारताई
- विखेंच्या शिर्डीत महसूलमंत्री थोरातांच्या संपर्क कार्यालयाचे लवकरच उद्घाटन
- शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
