अमरावती : कोरोना उपचारासाठी लागणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा, तसेच ऑक्सिजनचा आवश्यक तिथे पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयातील कंट्रोलरूममधून संनियंत्रण होत असून, जिल्हा स्तरावरही कंट्रोलरूम कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत समन्वय व संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावरही स्थापित समितीने सतत समन्वय ठेवून काटेकोर संनियंत्रण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्या या स्थितीवर अतिशय बारीक लक्ष ठेऊन आहेत, त्यासाठी त्यांचे अभिनंदन गरजेचे आहे.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रुम स्थापन केली आहे. याद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियंत्रणासह आता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा नियंत्रित केला जात आहे.
कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी निवासी उपजिल्हाधिका-यांमार्फत मागणी नोंदवायची असून, जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने उपलब्ध करुन द्यायचा आहे. या कंट्रोल रुममध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. त्याचप्रमाणे, जिल्हा स्तरावरही कंट्रोलरूम स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रुम स्थापण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, निवासी उपजिल्हाधिकारी व विविध अधिका-यांचा समावेश असलेली समितीही स्थापण्यात आली आहे. याअनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी नियमित समन्वय करून ऑक्सिजनच्या अखंडित पुरवठ्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय, तसेच खासगी रूग्णालये, महानगरपालिका आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्त असणार्या सर्व रुग्णालयांची ऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता संकलित करून रूग्णसंख्या, तसेच जिल्ह्यातील रूग्णालयांची आवश्यकता व यासंबंधीची स्थिती पाहून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांना लागणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनची संख्या आणि उपलब्ध साठा याचा सातत्याने आढावा घेऊन ज्या भागात रुग्ण आहेत त्या भागात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शनच्या साठ्याबाबत तसेच दैनंदिन वितरण व वापर याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश असून, कोरोना उपचारात सरसकट सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन न देता रुग्णाला कोणत्या टप्प्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरावे यासाठीचे आवश्यक प्रोटोकॉल शासनाकडून ठरविण्यात येणार आहेत. शासकीय, तसेच सर्व खासगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी ही हेल्पलाईन जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालय स्थित संवाद कक्षाचा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- …अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा इशारा
- पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचा सुवर्णदिवस!
- रुग्णसंख्या बघता अरोग्यसेवा वाढण्याची गरज, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- ५० सुवर्णकारांना दिला मदतीचा हात…लोकमंगलमुळे जगणे झाले सोपे!
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

