Share

शेतकर्‍यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर       

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : बुलडाणा व मोताळा तालुक्यासह जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हजारो शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी तात्काळ मुंबईला जाऊन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांची व्यथा मांडली व अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

यावर्षी संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस होता. त्यामुळे पिकसुद्धा चांगले आले होते. मात्र, शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे तो हिरावून घेतला. गेल्या दोन आठवड्यात बुलडाणा आणि मोताळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आला. पुरामुळे नदिकाठच्या शेतातील माती खरडून वाहून गेली. तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली पाण्यामुळे पिके काळपटली आहे.
अनेक शेतकर्यांचे पीक जमिनीवर झोपून सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटले आहे.

मागील वर्षी अशीच अतवृष्टी झाली होती. तेव्हाही शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावर्षी तर शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी बँक व सोसायट्यांकडून कर्ज काढून पेरण्या केल्या. आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानंतर शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. माझ्या मतदार संघातील बुलडाणा व मोताळा तालुक्यासह जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ शासनाकडून भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आ. संजय गायकवाड यांनी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!