Share

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३८ हजारांवर पोहचल आहे. सामान्य माणसांसोबत राजकीय नेते तसेच लोकप्रतिनिधी देखील कोरोना बाधित होत आहे.

आता कोपरगावच्या माजी आमदार व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी जिल्ह्यात पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत मतदारसंघात संपर्क दौऱ्यावर होत्या. मार्च महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता.

त्यानंतर मतदार संघात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून स्नेहलता कोल्हे प्रशासनाला सोबत घेऊन लोकांना सतर्क करत होत्या. परंतु काल त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये आपली कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्यामध्ये त्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मतदार संघातील त्यांचे कार्यकर्ते, समर्थक व मित्र मंडळींना एकच धक्का बसला आहे. अलीकडच्या काही दिवसांत जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!