Share

राष्ट्रवादी काँग्रेस देणार भाजपला मोठा धक्का? ‘या’ बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : १०५ आमदार निवडून येऊन सुद्धा विरोधी पक्षपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील नेत्याची तथाकथित नाराजी वेळोवेळी समोर आली आहे. तर आता या नाराजीचा उद्रेक होऊन पक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याचे आज सकाळपासून होणाऱ्या राजकीय बैठकांवरून वर्तवले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार असून भाजपचे अन्य काही नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाना उधाण आलं आहे. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषतः भाजपातील नेत्यांना यांना राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे.

नाथाभाऊच ठोकणार राम-राम?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!