Share

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचेच वेतन थकले ; विरोधी पक्षनेत्याने पुढाकार घेतल्याने मिळाला दिलासा

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरी म्हणून राज्यासह देशाच्या पटलावर ठसा उमटवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात सद्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोज सुमारे आठशे ते हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असताना देखील गेले पाच महिने शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कचरावेचक कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महानगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा संकलन करणा-या अँन्टोनी एस.आर.एल. कंपनीच्या कंत्राटी कामगरांनी काल (दिनांक १४ सप्टेंबर) रोजी पगार न झाल्यामुळे संप केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी त्याठिकाणी धाव घेऊन कामगरांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या विनंतीवरुन या कर्मचा-यांनी काम सुरु केले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व त्या कंपनीच्या वरीष्ठाशी संपर्क साधून या कामगाराचे वेतन त्वरीत देण्याबाबत आदेश दिले.

महिन्याची १४ तारीख आली तरी या कष्टक-या कामगारांचा पगार अजून का केला नाही तसेच यास जबाबदार कोण? असा जाब देखील विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी विचारला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलनाचे काम जीव धोक्यात घालून करीत असताना या कर्मचा-यांचा पगार न झाल्यामुळे एक दिवसात वेतन देण्याबाबत बजावले. एक दिवासात वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील  दिला आहे. येथून पुढे वेळेवर वेतन देण्याबाबत त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिका-यांना सुनावले असून राजू मिसाळ यांनी या कामगारांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!