Share

पुण्यात मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना बजावली नोटीस

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आणि आता जनतेमध्ये पुन्हा असंतोष वाढायला लागला आहे. सध्याचं महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडलंय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी निदर्शने व आंदोलने केली जात आहे, तर कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मराठा संघटना यात सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात आक्रमक भुमिका घेतल्याचे पाहायला मिळत असतानाच पुण्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यात कार्यकर्ते एकत्र येऊन १७ सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत होते. ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील या नोटिशीतुन सांगण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!