🕒 1 min read
सांगली : गेले ५ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक स्थानिक लोकप्राधिनिधी ते मंत्री व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर, ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पावसाळी अधिवेशनाला देखील मुकावं लागलं होत.
आता, काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले. त्यांच्यावर पुण्यात उपचार केले जाणार असल्याचे समजत आहे. ” धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच!थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो ” असे ट्विट त्यांनी सांगितले.
यासोबतच त्यांनी, ” गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, ही विनंती. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोन द्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन.” असे सांगत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, ही विनंती.
माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोन द्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन.— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) September 11, 2020
” माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या योजना, कोरोना रोखण्यास उपाययोजना, मंत्रालय बैठका, भंडारा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज… संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास! #सदैव_आपल्यासोबत “, असे ट्वीट करत विश्वजित कदम यांनी कोरोनाची ही लढाई लवकरच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते- राधाकृष्ण विखे
काँग्रेसच्या इशाऱ्यावरून कंगनावर कारवाई: प्रज्ञासिंह ठाकूर
यामुळे डॉक्टरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
