मुंबई : कोरोनाच्या काळात देवदूत बनून रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी आता माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. सहकारी डॉक्टराचा मृत्यू झाल्यानंतरही सरकराने विमा कवच नाकारल्याची व्यथा त्यांनी ठाकरेंसमोर मांडली आहे.
कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, कोरोना काळात सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, मात्र मृत्यू झालेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात आहे.यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलो असल्याचे डॉक्टरांनी सांगितले
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधी वीज बिलांविरोधात, जिम आणि धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आवाज उठवला आहे.दरम्यान आपल्या खळ्ळखट्याक भूमिकेतून न्याय देणारी मनसे आता डॉक्टरांसाठी धावणार का ?हे पाहावे लागणार आहे.
महत्वाची बातमी
रियाचा मुक्काम जेलमध्येच ; जामीन नामंजूर!
श्रीरामपूरच्या लॉकडाऊनला माझा विरोध- भानुदास मुरकुटे
असं असेल मुंबई ईंडीयंसच्या सामन्यांचं वेळापत्रक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

