Share

पोलीस भरतीमध्ये जास्तीत-जास्त पदे भरा- निलेश लंके

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या पोलिस भरती आराखड्याचा सरकारने पुर्नविचार करावा. तसेच पोलिस दलावरचा ताण कमी करण्यासाठी आगामी पोलिस भरतीत जास्तीत जास्त पदे भरावीत. अशी मागणी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात ते पुढे म्हणाले, स्व.आर.आर.पाटील गृहमंत्री असताना पोलिस भरतीसाठी शारीरिक सराव परीक्षा ही १०० गुणांची व लेखी परीक्षा ५० गुणांची होती. परंतु तद्नंतर आलेल्या सरकारने त्यात बदल करत शारीरिक सक्षम असणार्‍या तरुणांसाठी होणारी शारीरिक सराव परीक्षेला कमी गुण व लेखी परीक्षेला जास्त गुण असा पायंडा पाडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण शारीरिक क्षमता असूनही त्यांना पोलीस भरती प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत आहे. असे आ.लंके म्हणाले.

सरकार दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया राबवत असते. अनेक मुले व मुली त्यासाठी अर्ज करत असतात. मागील सरकारच्या कालावधीमध्ये अतिशय तुटपुंजी पदे काढून युवक व युवतीचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी जी पोलीस भरती प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली होती अगदी तशाच प्रकारची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा आपल्या सरकारने राबवावी व महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार मुला-मुलींना संधी उपलब्ध करून द्यावी, असे लंके यांनी निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

‘त्या’ कारवाईची गरज नव्हती, शरद पवारांची प्रतिक्रिया

कंगणाचं कार्यालय कशासाठी पाडलं? हा सूड नाही तर काय आहे?

कंगना जिंकली , शिवसेना हरली ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!