🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व मंदिरे बंद ठेवली आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवत दर्शनव्यवस्था कशी सुरळीत ठेवायची, याबाबत तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही.सुब्बारेड्डी यांनी साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. पुढील महिन्यात तिरुपती येथे होणाऱ्या ब्रह्मोत्सवाचे निमंत्रण संत मंडळींना देण्यासाठी ते ऋषिकेश येथे गेले होते. तेथून परतताना त्यांनी शिर्डीला भेट दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थाने आपली दर्शनव्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत ठेवली आहे. सध्या तिरुपती येथे रोज १२ ते १३ हजार भाविक दर्शन घेत असून उत्पन्न एक कोटींवर गेले आहे. पूर्वीच्या तुलनेत निवांत दर्शन होत असल्याने, भाविकांच्या संख्येबरोबरच दानपेटीतील रक्कम देखील वाढली आहे. असे निरीक्षण वाय.व्ही.सुब्बारेड्डी यांनी भेटीत नोंदविले.
ते म्हणाले, लॉकडाउनपूर्वी रोज दर्शनासाठी ७० हजार भाविक येत तसेच तेव्हा दररोज तीन कोटी रुपये उत्पन्न मिळायचे. जून पासून तीन हजार भाविकांना प्रवेश देऊन आम्ही मंदिर खुले केले. आता ही संख्या १२ हजारांवर गेली आहे. या काळात अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाले. परंतु आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आता पूर्ण नियंत्रणात आला आहे. ओझोनच्या सहाय्याने भाविकांचे निर्जंतुकीकरण करणारी आधुनिक यंत्रणा आम्ही मंदिर परिसरात बसविली आहे. आमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिर्डी संस्थांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर, नागपुरात होणार हा प्रयोग
हा मर्दपणा ‘तिकडे’ दाखवा ; अतुल भातखळकरांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान
श्रीरामपूर शहर लॉकडाउन करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
