Share

हा मर्दपणा ‘तिकडे’ दाखवा ; अतुल भातखळकरांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.

कंगनाच्या कार्यालयावरील ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील शिवसेनेसह मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला असून इतर अनधिकृत बांधकामांवर देखील अशीच कारवाई करा असे आव्हान दिले आहे.

“शिवसेनेचा पुरुषार्थ…हा मर्द पणा जरा वांद्र्यातील घुसखोरांच्या चार मजली झोपड्यांवरही दाखवा…” असे थेट आव्हान देत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग केले आहे.

काय आहे कंगनाची प्रतिक्रिया?

ऑफिसवर हातोडा पडल्याने कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. त्यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे. आता आणखी एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी तिच्या कार्यालयाचे तोडतानाचे फोटो शेयर करत तिने  Pakistan #deathofdemocracy असं म्हटलं आहे.

यासोबतच तिने आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत ठाकरे सरकारची तुलना बाबराशी केली आहे. आज तिथे बाबर आला आहे, पण बाबर तु हे लक्षात ठेव, तिथे पुन्हा राममंदिर उभारलं जाईल, “जय श्रीराम” असं ट्विट करून तिने खळबळ उडवून दिली आहे. आता यावर नवीन वादंग सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:-

माझं राम मंदिर उध्वस्त होतंय;कंगणाने केली ठाकरे सरकारची तुलना बाबराशी!

या कठीण काळात आम्ही कंगनाच्या सोबत ; भाजपचा कंगनाला जाहीर पाठिंबा

‘लोकशाहीचा मृत्यू असं ट्विट करत कंगणाने पुन्हा केली मुंबईची तुलना पाकिस्तान शी’

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!