Share

स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर, नागपुरात होणार हा प्रयोग

Published On: 

नागपूर : नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सोयी-सुविधा आणि साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असून स्कूल व्हॅन उपयोगात नाहीत. अशा स्थितीत स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रूग्णवाहिकेत रुपांतर केल्यास रुग्णांसाठी ते सोयीचे होईल. स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात यावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. वेळेवर उपचार मिळण्यास उशीर होत असल्याने मृत्यूसंख्याही वाढत आहे. यासाठी साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. नागपूर महानगरपालिका रुग्णवाहिकांसह अन्य साधनांची व्यवस्था करीत आहे. मात्र आता कोरोनाशी संघटित लढा देण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.

स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले तर अनेक रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी तातडीची सेवा मिळू शकेल. तसेच गेल्या अनेक महीन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणा-या व्हॅन चालकांना रोजगार उपलब्ध होईल. याची तात्काळ दखल घेण्याची विनंतीवजा सूचना महापौर संदीप जोशी यांनी पत्रातून केली आहे.या सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-

हा मर्दपणा ‘तिकडे’ दाखवा ; अतुल भातखळकरांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान

श्रीरामपूर शहर लॉकडाउन करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक

माझं राम मंदिर उध्वस्त होतंय;कंगणाने केली ठाकरे सरकारची तुलना बाबराशी!

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!