Share

श्रीरामपूर शहर लॉकडाउन करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे: मागील दोन दिवसांपासून श्रीरामपूर शहरासह तालुक्यात ५० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. समूह संक्रमणाच्या दिशेने शहराची वाटचाल सुरु झाली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात दहा दिवस पूर्णतः लॉकडाऊनची मागणी विविध घटकांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पालिकेत सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र अनलॉक नियमावली लागू आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर श्रीरामपूर शहराची बाजारपेठ खुली झाली. लॉकडाऊन काळात प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरू लागले. जनतेची गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. मास्क लावण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग घरोघरी पोहोचला आहे. एकाच कुटुंबातील दहा-बारा जण पॉझिटिव्ह आढळत आहेत.

खासगी दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग, बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेल मालक व कामगार पॉझिटिव्ह आढळत आहेत. आता पोलिस व महसूल प्रशासन हतबल झाले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रीरामपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार असून त्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

माझं राम मंदिर उध्वस्त होतंय;कंगणाने केली ठाकरे सरकारची तुलना बाबराशी!

या कठीण काळात आम्ही कंगनाच्या सोबत ; भाजपचा कंगनाला जाहीर पाठिंबा

‘लोकशाहीचा मृत्यू असं ट्विट करत कंगणाने पुन्हा केली मुंबईची तुलना पाकिस्तान शी’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!