Share

‘मी एका गरजू रुग्णाचा बेड अडवणार नाही’, कोरोना पॉझिटिव्ह राजू शेट्टींचा घरीच उपचार

Published On: 

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा कोरोनाचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. शेट्टी यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी, मुलगा सौरभ यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या या तिघांचीही तब्येत उत्तम असून ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. या तिघांवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या वेळी राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे. आपण सर्वजण सुरक्षित राहा, तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट करत कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिलेली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की एक सप्टेंबर रोजी माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, ती आता पॉझिटिव्ह झाली आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार सध्या मी घरीच उपचार घेत आहे. कारण, तातडीने उपचार सुरू केल्याने मला रुग्णालयात जाण्याची आवश्‍यकता भासली नाही.

डॉक्‍टरांशी चर्चा करून ठरविले की आपण वेळीच उपचाराला सुरुवात केल्याने रुग्णालयात ऍडमिट होण्याची गरज नाही. एका गरजू रुग्णाचा बेड अडविण्याची आवश्‍यकता नाही. घरीच उपचार होणे शक्‍य आहे, त्यामुळे हे डॉक्‍टर मंडळी सकाळी आणि संध्याकाळी माझी घरी येऊन माझी तपासणी करत आहेत, असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या :

..तर मुंबई कायमची सोडून जाईन; कंगनाचे गृहमंत्र्यांना थेट आव्हान

ओरडून बोलल्याने कोरोना होतो, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर घणाघात

राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेची देवेंद्र फडणवीसांनी काढली लक्तरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!