मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर, राजकीय वातावरण चांगलेच तापलेल पाहायला मिळालं. काहींनी कंगनाचे समर्थन केले तर काहींनी पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
अभिनेत्री कंगना राणावतवर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगना ड्रग्स घेत असल्याचे अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत सांगितले होते . त्यामुळे कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
आता, अभिनेत्री कंगना रणौतने गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट आव्हान दिले आहे. कंगनाने ट्विट केले आहे, ‘मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय.’ असे प्रत्युत्तर कंगनाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय, राजेश टोपेंचा घणाघात
हक्कभंग, अनधिकृत बांधकाम नोटिशीनंतर आता कंगनाची ड्रग्ज प्रकरणी देखील होणार चौकशी
नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

