🕒 1 min read
औरंगाबाद : ‘आज मंदिर कल मस्जिद’ अशा आशयाचे ट्विट औरंगाबादचे खासदार ईम्तीयाज जलीलांनी केल्यानंतर आता वादंग सुरू झाले आहे. खासदार जलील हे आज औरंगाबादेतील खडकेश्वर मंदिरात प्रवेश करून आज मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र, हा वाद आता वेगळे वळण घेताना दिसत असून शिवसेनेच्या नेत्यांकडून खासदार इम्तियाज जलीलांवर टोकाची टीका केली जात आहे.
भाजपाने २९ ऑगस्ट रोजी राज्यभरातील प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी आर्त हाक देत केलेले घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन यानंतर इम्तियाज जलील यांचं आज मंदिर, कल मस्जिद या भूमिकेमुळं राज्यात प्रार्थनास्थळे उघडण्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
मंदिर-मशीदी ईम्तीयाज जलीलांची खाजगी मालमत्ता नाही-शिवसेना आमदार दानवेंंचा टोला
पुजाऱ्याना निवेदन देऊन खडकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचे नियोजन जलीलांकडून केले गेले होते, मात्र शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांसह या मंदिराबाहेर जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी, मंदिर-मशीदी जलीलांची खासगी मालमत्ता नाही असा टोला शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी लगावला.
सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो शक्य नाही!
तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हिंदूंची मंदिरं खुली करण्याशी एमआयएमचा संबंध नसून हिंदू मंदिरं खुली करण्यास आम्ही समर्थ असल्याचा इशारा देखील त्यांक यावेळी दिला आहे.
..तर 1962 पेक्षा जास्त हानी करु, चिन्यांची भारताला धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

