🕒 1 min read
मुंबई : भाजपचं घंटानाद आणि प्रकाश आंबेडकरांच्या थेट पंढरपूरतील आंदोलनाने राज्यात धार्मिक स्थळ उघडण्यासाठीची मोहीम जोरदार सुरू असतानाच आता यात एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट आहे.
काल (दि. ३१ ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेनेसोबत मिळून राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपूरात आंदोलन केले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पंढरपूरात दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला. तर, सोलापूर-पंढरपूर मार्गासह पंढरपूरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
..तर 1962 पेक्षा जास्त हानी करु, चिन्यांची भारताला धमकी
ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार असून त्यांनी राज्यातील कायदाव्यवस्था अंतर्गत असलेली बंदी मोडून असे आंदोलन करणे हे चित्र चांगलं नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
सामना अग्रलेख : आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर स्वागतच!
तर, आज सामनाच्या अग्रलेखातून देखील भाजपासह प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनावर निशाणा साधला असून आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असल्याचे स्वागत करत उपरोधिक टीका करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठाई माऊली असून जनतेसह सरकारचा माऊलीशी थेट संबंध आहे, त्यामुळे जे लोक मंदिरात घुसण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, असा टोला देखील लगावला आहे.
‘महाराष्ट्राच्या भाविक जनतेनी राज्यभरात केलेला घंटानाद अखेर उद्धव ठाकरे यांच्या कानी घुमला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

