🕒 1 min read
औरंगाबाद: ‘आज मंदिर कल मस्जिद’ अशा आशयाचे ट्विट औरंगाबादचे खासदार ईम्तीयाज जलीलांनी केल्यानंतर आता वादंग सुरू झाले आहे. मंदिर-मशीदी जलीलांची खासगी मालमत्ता नाही असा टोला शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी लगावला.
तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी खा.जलील यांनी सरकारने लवकरात लवकर मशीदी उघडण्यासाठीची परवानगी दिली नाही तर आम्ही 2 सप्टेंबरपासून मशिदी उघडू अस वक्तव्य केलं होतं आणि काल वंचितच्या आंदोलनानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आमदार दानवे यांनी त्यांचा समाचार घेतला. एमआयएमने पुजाऱ्यांंना निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेणे आणि मंदिरे- मशीदी उघडण्यासाठीची मागणी खा.जलील यांनी करणं हा एक राजकीय स्टंट आहे असाही आरोप आ.दानवे यांनी केला.
सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो शक्य नाही!
कोरोना काळामुळे धार्मिक स्थळं मागील पाच महिन्यांंपासून बंद असल्याने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलने करून मंदिरं खुली करण्याची मागणी केली होती. पंढरपूरात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी हजारो समर्थकांसह आंदोलन करून विठ्ठलाचे दर्शन घेतले होते.
..तर 1962 पेक्षा जास्त हानी करु, चिन्यांची भारताला धमकी
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन नियमावली जाहीर करून धार्मिक स्थळं उघडण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आभार व्यक्त केले होते.
सामना अग्रलेख : आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर स्वागतच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

