Share

..तर 1962 पेक्षा जास्त हानी करु, चिन्यांची भारताला धमकी

Published On: 

दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव अजूनही कायम आहे. 29 आणि 30 अॉगस्टला चीनी सैनिकांनी भारताच्या पुर्व लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त भारतीय लष्कराने दिल्यानंतर चीनने ही आगळीक केली आहे. चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ‘द ग्लोबल टाईम्स’ ने भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी स्पर्धा करायची असेल तर त्यांना 1962 पेक्षा जास्त नुकसान सहण करावे लागेल अस त्यात म्हटलंय!

चिनी  सैनिकांचा पुर्व लडाखमधील घुसखोरीचा डाव भारतीय सैन्याने उधळल्यानंतर चीनने आम्ही कुठेही घुसखोरी केलेली नाही असंही स्पष्टीकरण दिल आहे. मागील काही वर्षांपासून भारत आणि चीनचे संबंध विकोपाला गेले आहेत, डोकलामचा संघर्ष, गलवान खोरे, सैनिकी संघर्ष, हाणामारी आणि जवानांचे बळी अशा अनेक मुद्द्यांवरुन वाद झाले आहेत.आणि चीनने सातत्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयोग केला आहे.

सामना अग्रलेख : आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर स्वागतच!

सध्या चीनला आफ्रिकेतील देशांमधून मोठा पाठिंबा मिळत असून तिथे चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी चीनच्या भूमिचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे, आमच्याकडे पुरेसे सैन्य आहे, आमच्या आमच्या जमिनीवर आक्रमक होऊ देणार नाही, चिनी जनता सरकारच्या पाठिशी आहे आणि भारताने बलाढ्य अमेरिकेचा पाठिंबा मिळेल अशाही भ्रमात राहु नये असही या मुखपत्राने म्हटलंय. आता यावर भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालय आणि सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याची भारतीय जनतेला प्रतिक्षा आहे.

‘महाराष्ट्राच्या भाविक जनतेनी राज्यभरात केलेला घंटानाद अखेर उद्धव ठाकरे यांच्या कानी घुमला’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!