🕒 1 min read
मुंबई : काल (दि. ३१ ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेनेसोबत मिळून राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपूरात आंदोलन केले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पंढरपूरात दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला. तर, सोलापूर-पंढरपूर मार्गासह पंढरपूरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
शिवाजी चौकात कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं. या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांनी देखील समर्थन दिले होते. तर, मंदिरातील बडवे मंडळींनी विठ्ठलाची मूर्ती देऊन प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. या आंदोलनावेळी सोशल डिस्टनसिंगचा मात्र पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
सचिन सावंतांनी सांगितलं ‘रसोडे में कोन था!’
ऍड. प्रकाश आंबेडकरांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनभावनेचा आदर केला असून, राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरु करण्यात येतील, असं त्यांनी आश्वासन दिल असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले. तर, आंबेडकरांसह हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनावर सामनाने खरपूस समाचार घेतला असून आंबेडकरांच्या या भूमिकेचे स्वागत देखील केले आहे.
प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठांवरून दिला होता ‘हा’ इशारा, सरसंघचालकांनीही पूर्ण केली होती इच्छा
सामना अग्रलेख –
सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे. इतके असूनही अॅड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
वैभव पिचड यांच्याकडून आढळा धरणाचे जलपूजन…
नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला. कपाळास बुक्का, चंदन लावून अॅड. आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. अॅड. आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

