🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा जलपुजन सोहळा माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते पार पडला. अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्याला हे धरण वरदान ठरलेले आहे. आढळा धरणाचे ओव्हर-फ्लो चे पाणी कालव्याद्वारे सोडून शेतकऱ्यांचे बंधारे, तलाव भरून द्यावेत. आढळा जलाशय दुष्काळी भागाला वरदान आहे. ह्या धरणाच्या माध्यमातून या भागातील शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. असे प्रतिपादन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण भरले व त्यानंतर काही दिवसांतच निळवंडे धरण देखील भरले होते. या दोन्हीही धरणांचा जलपुजन सोहळा थाटामाटात आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थित पार पडला होता. शेतकरी वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले आढळा धरण भरल्यानंतर माजी आमदार वैभव पिचड यांच्या व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये धरणाचे सुरक्षित अंतर ठेऊन जलपुजन सोहळा पार पडला.
संघभूमी नागपुरातील ‘तो’ दिवस अन् संघाच्या आठवणीतील प्रणव मुखर्जी…
धरण परिसरात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यात यंदाच्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मदत आवश्यक आहे असे पिचड म्हणाले. यावेळी रामनाथबापू वाकचौरे, कैलासबाबा शेळके, बाबासाहेब उगले, सुहास कर्डिले, अरुण शेळके यांच्यासह गुणोरे, हिवरगाव, डोंगरगाव, वीरगाव, देवठाण व लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
‘आज मंदीर कल मस्जिद’-खा. ईम्तीयाज जलील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

