नागपूर : सात जून रोजी नागपुरात झालेल्या कार्यक्रमापूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रणवदांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत प्रणवदांनी संघाच्या शाखेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु माजी राष्ट्रपतींना शाखेचे काम कसे चालते हे बघण्यासाठी बोलावण्याऐवजी त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्याचे संघाने ठरवले. प्रारंभी त्यांना संघाच्या विजयादशी उत्सवासाठी निमंत्रित करण्याचे ठरले होते. मात्र, काही कारणास्तव यात बदल झाला.
त्यानंतर ७ जून २०१८ रोजी झालेल्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रणवदांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी बोलताना कोणत्याही प्रकारची कट्टरता तसेच धर्म वा असहिष्णुतेच्या भावनेवर आधारित या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास आपले देश म्हणून असलेले अस्तित्वच धोक्यात येईल, असा इशारा प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून दिला होता.
वैभव पिचड यांच्याकडून आढळा धरणाचे जलपूजन…
विविध मुद्द्यांवरील हिंसक प्रतिक्रियांमुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे भय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून संवादाचे सर्व मार्ग अनुसरून देशाला बाहेर काढले, तरच संपूर्ण समाज लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल. वैविध्य आणि सहिष्णुतेत भारताचा आत्मा दडला आहे. लोकशाहीमध्ये चर्चा होईल, काही मतांशी आपण सहमत असू , काहींशी नाही. पण, मत व्यक्त करण्याचा अधिकार आपण नाकारू शकत नाही, असेही ते म्हणाले होते. अपेक्षांचा फुगा मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी पत्र पाठवून या निणर्याचा फेरविचार करण्याचा सल्ला त्यांना दिला होता.
प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती असे मत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केले होते. दुसरीकडे संघाला कुणीही परके नसल्यामुळे प्रणवदांना दिलेल्या निमंत्रणावरून झालेले वाद निरर्थक असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात सांगितले होते.
संघभूमी नागपुरातील ‘तो’ दिवस अन् संघाच्या आठवणीतील प्रणव मुखर्जी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

