मुंबई : विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीला आणि त्यांच्या भविष्याबाबत निर्माण झालेल्या अस्थिरतेला राज्य सरकार व मंत्री जबाबदार असल्याचे आरोप भाजपाने लावले आहेत. तर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
अंतिम वर्ष परीक्षा घेण्याच्या युजीसीच्या सक्तीला न्यायालयाने देखील समर्थन दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलेच वातावरण तापले आहे. युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेवर काल निकाल आल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. परीक्षा घ्याच! पण कशा? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
आणखी एका नेत्याने राहुल गांधींना नेतृत्व देण्याबाबत केली ‘ही’ मोठी मागणी
यासोबतच विद्यार्थ्यांचा जीव वाचवायचा कि परीक्षा घ्यायच्या हा सरळ प्रश्न होता, पण पदवी परीक्षेचे त्रांगडे सर्वोच्च न्यायालयात गुंतून पडले होते, ते वेळेत सुटले असते तर बरे झाले असते. सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्ती प्रशांत भूषण यांच्या अवमान याचिकेत इतके गुंतून पडले कि परीक्षांचा गुंता त्यांना वेळेत सोडवता आला नाही, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
सामना अग्रलेखाचा काही भाग :
मुलांचे प्राण वाचवायचे की परीक्षा घ्यायच्या, हा सरळसोट प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयाने आता स्पष्ट केले आहे, परीक्षा होणारच! परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, पण परीक्षा घ्याव्याच लागतील, राज्यात परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असे न्यायालयाचे म्हणणे आहे. ते चुकीचे नाही, पण राज्य सरकार तरी वेगळे काय सांगत होते? परीक्षा आता घेता येणे कठीण आहे. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्या अग्निपरीक्षेची आठवण करून देणारा हा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा अग्नी पेटला आहे.
मोठी बातमी: सुरेश रैना ‘आयपीएल’ ला मुकणार; वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला
‘नीट’, जेईई’ या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार ठाम होते व आहे. पदवी परीक्षेचे त्रांगडे सर्वोच्च न्यायालयात गुंतून पडले होते, ते वेळेत सुटले असते तर बरे झाले असते, पण सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्ती भूषण यांच्या अवमान याचिकेत इतके गुंतून पडले की,परीक्षांचा गुंता त्यांना वेळेत सोडवता आला नाही.
देशात कोरोनाचा कहर सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी तब्बल ७५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

