Share

अच्छा चलता हु दुवा मे याद रखना ….. गूड बाय तुकाराम मुंढे

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महापालिकेतील तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील सत्ता संघर्षाचा आज समारोप झाला. तुकाराम मुंढे यांची जीवन प्राधिकरणाऱ्या सदस्य सचिवपदी बदली झाली अन् बातमी वाऱ्यासारखी पसरली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तर ‘हा सत्ताधाऱ्यांचा विजय आहे ,, अखेर संदीपजीच ( महापौर ) जिंकले’ अशा सोशल मिडियावर पोस्ट केल्या. काहींनी मात्र मुंढेंच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांनी अल्पावधीतच अतियश चांगली पकड नागपूर महापालिकेवर निर्माण केली. प्रारंभीच्या काळात शहरातील कोरोनाच्या स्थितीवर त्यांनी उत्तम नियंत्रण मिळविले होते. मात्र टाळेबंदीच्या काळात श्रेयवादाचा खेळ रंगण्यास सुरुवात झाली अन् आयुक्त व महापौरांमध्ये खंडाजंगी होण्याचे प्रमाणही वाढले.

महाराष्ट्राला तुकाराम मुंढे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत. शिवाय शासकीय सेवेतील नागपूर महानगर पालिकेतील जबाबदारी ते दुसऱ्यांना हाताळणार होते. त्यामुळे येथील कामकाजाचा व माणसांचा मुंढेंना अनुभव होता. महापालिकेच्या एकाच विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुंढेंनी रातोरात बदल्या केल्या आणि महापालिकेतील विभागांवर अचूक नियंत्रण मिळविण्यात ते यशस्वी झालेत. पुढे कामांचा धडाका सुरू झाला तसा तुकाराम मुंढे सोशल मिडियावर देखील नागरिकांच्या संपर्कात राहू लागले.

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि जिल्हाधिकारी ही परिस्थिती हाताळतील असा अंदाज असताना टाळेबंदीची जबाबदारी तुकाराम मुंढेंनी स्वत : च्या खांद्यावर घेतली. त्यानंतर मुंढेंचा प्रत्येक निर्णय हा नागपूर वासियांसाठी महत्त्वाचा राहीला.

जून महिन्याच्या प्रारंभी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदावर आयुक्त या नात्याने तुकाराम मुंढे यांनी हक्क सांगत निर्णय घेण्यास प्रारंभ केले. त्यांच्या या निर्णयांमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनेक कामांवर बंधने आली अन् महापौर संदीप जोशी यांनी त्यांना उघडपणे विरोध करणे प्रारंभ केले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील शीतयुद्ध त्याचवेळी चव्हाट्यावर आले. इतकेच नव्हे तर मुंढेंच्या तक्रारींचा पांढा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे वाचण्यातही सत्ताधारी नेते यशस्वी झाले.

विशेष म्हणजे तुकाराम मुंढे व नागपूर शहरातील सत्ताधाऱ्यांचे कधीही जुळले नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयांना सत्ताधाऱ्यांनी कचऱ्याची टोपलीच दाखवली. आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे भाजपाच्या अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, शहरातील सामान्य माणसाच्या हृदयात दूखाचे लोळ उठले असतील हे निश्चित. एका नेटकऱ्याने “अच्छा चलता हु टुवा मे याद रखना ….. गूड बाय तुकाराम मुंढे” ही अनोखी पोस्ट शेअर केली आहे.

‘मी लढणाऱ्या बापाचा, लढणारा मुलगा’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीत धुसपूस; खासदार संजय जाधवांनी दिला राजीनामा, राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

Breaking News : धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!