परभणी : आधी पारनेरचे नगरसेवक आणि मग आता थेट खासदारांनीच दिला राजीनामा. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवत सर्वांनाच धक्का दिला आहे. तर, या राजीनाम्यासोबत त्यांनी एक पत्र देखील पाठवले असून त्यातून धक्कादायक आरोप त्यांनी केले आहेत.
गेल्या महिन्यातच शिवसेनेच्या पारनेरमधील नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले होता. यावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या नगरसेवकांची घरवापसी करण्यात आली होती. मात्र, आता शिवसेनेसह महाविकास आघाडीला आणखी एक हादरा बसला असून थेट खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेतील वाद संपणार कधी ?, का होतेय मराठी नेतृत्वाची मागणी… वाचा
जाधव यांनी राजीनाम्यासोबत एक पत्र पाठवले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळणाऱ्या वागणुकीवरून गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये परभणीत स्थानिक पातळीवरील असलेले मतभेद सर्वश्रुत आहेत. याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी केली जात असल्याच्या आरोप करत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.
निष्ठावंत कार्यकर्ते सोडणार मुकुल वासनिकांची साथ ?, काँग्रेस मधील गटबाजी येणार चव्हाट्यावर


