Share

Breaking News : धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!

Published On: 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कारवायांमुळे त्यांना राजकीय मंडळी , व्यापारी, अवैध धंदे करणाऱ्या अनेक माफियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले असले तरी कामाची पद्धत त्यांनी कायम ठेवली असल्याचे कोरोना काळात देखील पाहायला मिळाले होते.

काल सकाळीच, तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विटद्वारे सांगितले होते. सद्या ते घरीच विलगीकरणात असून तेथूनही ते कर्तव्य बजावत आहेत. याआधी देखील अनेकवेळा नागपूरचे महापौर संदीप जोशी व त्यांच्यातील वाद समोर आले होते.

मोठी बातमी : शिवसेनेला खिंडार; खासदार संजय जाधवांनी दिला राजीनामा, राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

जानेवारी महिन्यात त्यांची नागपूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर आता अवघ्या ७ महिन्यांतच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढेंची नियुक्ती आता मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संविधान अवमानप्रकरणी प्रवीण तरडेंवर गुन्हा दाखल करा, विविध संघटनांची मागणी; भारती विद्यापीठ पोलीस चौकीसमोर निषेध आंदोलन

तुकाराम मुंढे यांनी आता पर्यंत नागपूर जिल्हापरिषद सीईओ, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर मंदिर समिती चेअरमन, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी, नाशिक, मंत्रालय, नागपूर महापालिका आयुक्त आदी पदभार सांभाळले असून त्यांची वारंवार बदली केली जाते. ते जिथे जातात तिथे अवैध व्यवसाय धंदे, अनियमितताला चाप लावतात, अशी त्यांची ओळख आहे.

नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेतील वाद संपणार कधी ?, का होतेय मराठी नेतृत्वाची मागणी… वाचा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!