मुंबई : दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांना कायम ठेवण्याच्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर सोनिया गांधी आता पुन्हा सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहे. आज त्यांनी भाजपा वगळता सत्ता असलेल्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या ऑनलाइन बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीवेळी जीएसटी, देशाची आणि राज्यांची असलेली सद्याची आर्थिक स्थिती, जेईई-नीट परीक्षा तसेच लॉकडाऊन यासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना दुसरी एक बैठक असल्याने त्यांना प्रथम बोलू देण्याची विनंती यावेळी सोनिया गांधी यांनी केली. राज्यातील कोरोनाची असलेली बिकट परिस्थिती पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
विनायक मेटेंच्या आरोपांवर मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिले प्रत्युत्तर
त्या म्हणाल्या, उद्धवजी तुम्ही कोरोनाशी खूप चांगलं लढत आहात, ममता बॅनर्जी यांनी असे म्हणताच त्यांनी, ‘मी लढणाऱ्या बापाचा, लढणारा मुलगा आहे’, आडे उद्गार काढले. सोबतच सोनिया गांधी यांची पुन्हा काँग्रेसच्या हंगामी आध्यक्षपदी निवड झाल्याबाबद्दल अभिनंदन देखील केले. केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा विरोधात लढायचं कि घाबरून राहायचं हे देखील ठरवण्याची गरज असून भक्कम भूमिका घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
मावशीच्या गावात साकारणार मुंडे साहेबांचा पुतळा


