मुंबई : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी शिथिलता आणली गेली.महाराष्ट्र राज्यात आता आंतरजिल्हाबंदी उठवण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे.
मात्र, कोरोना संसर्गाचा अजूनही असलेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे. भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून राज्यभरातील मंदिर प्रमुखांची काल मंगळवारी बैठक पार पडली आहे. केंद्र सरकारने काही अटी शर्थीवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना राज्यसरकार मात्र परवानगी देत नसल्याच्या विरोधात जन आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्ट रोजी राज्यसरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.
अभाविपची उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी, धुळ्यात अडवला अब्दुल सत्तारांचा ताफा
यापूर्वी, करोडो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिरावरील देखील बंदी उठवत भाविकांसाठी मंदिर खुले करण्याची मागणी अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती, “शिर्डीचं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे.”
आमदार निलेश लंके यांचा खा.विखेंवर पलटवार
“ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा,” इशारा विखेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला दिला होता.
मंगळवेढा उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिका सर्वेक्षणाचा प्रस्ताव दहा दिवसात पाठवा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
