🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : पारनेर तालुक्यात मागील दोन आठवड्यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोव्हिड सेंटरचे उद्घाटन केले होते, त्यावेळी कुठे गेला होता सोशल डिस्टंसिंग ? असा सवाल करत कर्जत-जामखेडमध्ये रोजच वेगवेगळे उद्घाटने सुरू आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्या सत्ताधारी आमदारांसह आरोग्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करावा असे मत खासदार डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त करीत त्यांनी आमदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला होता. यावरून आमदार निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर पलटवार केला आहे. मी काम करणारा माणूस आहे व काम करणाऱ्या माणसाने इकडे तिकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे कोण काय बोलतय याला मी महत्त्व देत नाही. मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. असे लंके म्हणाले.
खा.विखे यांच्या टीकेनंतर तातडीने आमदार लंके यांची प्रतिक्रिया आली आहे. कोविड सेंटर उद्घाटन कार्यक्रमाला आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळले की नाही हे त्यांना माहीत नाही, आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळत कार्यक्रम केला. राज्याचे आरोग्यमंत्री त्या ठिकाणी येतात, याचे आम्हाला भान होते. या कार्यक्रमाला शंभर टक्के सोशल डिस्टंसिंग पाळले गेले होते. त्यामुळे मी खासदार विखेंच्या बोलण्याला महत्त्व देत नाही असे लंके म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात काही कामानिमित्त आमदार लंके आले असता ते माध्यमांशी बोलत होते. तालुक्यात काम करत असताना सरकारने ठरवून दिलेले नियम व अटींचे पालन मी करत आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय त्याला मी महत्त्वच देत नाही असे आमदार लंके म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील त्या आमदारांवर गुन्हे दाखल करा- खासदार सुजय विखे
#जिद्द: डोंगरावर जाऊन शिक्षण घ्यावे लागत असलेल्या ‘त्या’ तरुणीची प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली दखल
रखडलेला बडनेरा वाशीम रेल्वेमार्ग गडकरींच्या राज्यात होणार का पूर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
