धुळे : गेल्या पाच महिन्यात कोरोना महामारीने घातलेला कहर व त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली संभ्रमता यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, मागणी अभाविपने केली आहे.
अभाविपने उदय सामंत यांच्या राजीनाम्याप्रकरणी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे राज्यभरात दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी इतर शैक्षणिक समस्या व उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी मांडत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांचे देखील वाहन अभाविपने अडवले होते, ज्यामुळे त्यांना पायी जावे लागले.
‘बापू ! आमचे पद वाचवा’ पद गेलेल्या भाजप तालुकाध्यक्षांचे माजी मंत्री सुभाष देशमुखांना साकडे…
आता धुळ्यामध्ये, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अभाविपने अडवल्याचे व्हिडिओ सद्या समोर येत आहेत. यानंतर, अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी लावले आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण पोलीस प्रशासनाने अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून केली यावरून लक्षात येत आहे विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन हे सरकार किती असंवेदनशील आहे
जाहीर निषेध
— Swapnil Begde (@sbegde50) August 26, 2020
तुकाराम मुंढें पाठोपाठ अतिरिक्त पोलिस आयुक्तांनाही कोरोनाची लागण
कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आले असल्याने, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्यावे, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० % कपात करण्यात यावी तसेच, विद्यापीठांनी लावलेल्या चुकीच्या निकलांचे पुनर्मूल्यांकन करावे अशा मागण्या देखील यावेळी अभाविपतर्फे करण्यात आल्या.
रखडलेला बडनेरा वाशीम रेल्वेमार्ग गडकरींच्या राज्यात होणार का पूर्ण

